© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
ज्यांनी एखाद्या व्यक्तीला सुसाइडमुळे गमावले आहे त्यांना आधार देण्याचे विविध मार्ग
शोक समजून घ्या
त््याांनी काही गमावले आहे हे स्वीकारा
त््याांना शोक करू द्या
त््याांचं म्हणणं ऐकू न घेण्यावर लक्ष केें द्रित करा
प्रत्यक्ष आधार देऊ करा
अधिक आधार मिळवण्यासाठी त््याांना मदत करा
सुसाइडचे संकेत दि सत आहेत का हे बघा
पियर सपोर््ट ग्रुप शी संपर््क करण्यात त््याांना मदत करा
सकारात्मक आठवणी आणि कि स्से शेयर करा
झालेल्या मृत्यूवि षयी इतरांशी संवेदनशीलतेने बोला
स्वतःची काळजी घ्या
आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला गमावल्यानंतर शोक ही एक स्वाभाविक भावनिक प्रतिक्रिया असते. सर््वसाधारणपणे, शोकाकुल व्यक्ती अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक भावना अनुभवत असते. शोक करताना त््याांना अनेक चढउतार अनुभवास येऊ शकतात. ज््याांनी सुसाइडमुळे आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले आहे त््याांचा अनुभव चांगल्या पद्धतीने समजून घेण्याआधी शोक या भावनेविषयी अधिक जाणून घेतले तर ते उपयोगी ठरेल.
प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या वियोगानंतर त््याांच्याशी तुम्ही संपर््क केला नाहीत तर त््याांच्या दुःखात भर पडू शकते. त््याांच्यासाठी आधाराचा हात पुढे करून आणि जेव्हा कधी त््याांना आधार हवा असेल तेव्हा तुम्ही आहात हे त््याांना जाणवून दिले तर ते त््याांच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकेल. त््याांना बोलले तर त््याांना बरे वाटेल का किंवा कोणीतरी सोबत असावे असे वाटते आहे का असे त््याांना विचारा. प्रत्येकजण वेगवेगळ्या रीतीने शोक करतात हे आपण समजून घेणेही महत्त्वाचे आहे. काहीजणांना अशा वेळी थोडा वेळ तरी सर््वाांपासून दूर रहावे असे वाटते. त््याांची तशी इच्छा असेल तर त््याांना स्वतःचा वेळ देऊन, त््याांची चौकशी नियमितपणे करणे योग्य ठरेल.
शोक करण्यासाठी कोणतीही पद्धत ‘योग्य’ नसते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी हवा तितका वेळ देणे उचित ठरेल. शोकाचा एक ठराविक कालावधी नसतो. शोकाकुल व्यक्तीसाठी, त््याांच्या प्रिय व्यक्तीला गमावून महिने ओलांडून गेल्यावर देखील दुःख आणि खेदाचे आवेग अनुभवास येऊ शकतात. नियमितपणे त््याांची चौकशी करत रहा आणि त््याांच्यासाठी तुम्ही आहात ह्याची त््याांना जाणीव करून द्या.
शोकाकुल व्यक्तीसाठी करता येण्यासारखी बहुमूल्य गोष्ट म्हणजे त््याांचं म्हणणं ऐकून घेणे. त्या व्यक्तीवर आपलं लक्ष केें द्रित करा आणि त््याांच्याकडून अधिक माहिती काढून घेण्याचा प्रयत्न न करता जे काही ते शेयर करतील त्याचा आदर करा. सुसाइड का झाली ह्याचे अंदाज बांधणे टाळा कारण त्यामुळे त््याांच्या दुःखात भर पडू शकेल.
शोकाकुल व्यक्तीला कदाचित हे कळत नसेल की त््याांना कसली गरज आहे किंवा आधार मागणे त््याांना खूप कठीण वाटत असेल. “मी काय मदत करू शकत असेन तर मला सांगा” असं म्हणण्यापेक्षा काही नेमके प्रश्न विचारा. जसे की:
शोकातून सावरत असताना थोड्या आधाराची गरज लागू शकते व एकट्यानेच स्वतःला सावरण्याची काहीच गरज नाही. त््याांची इच्छा असेल तर, अधिक आधार मिळवण्यासाठी तुम्ही त््याांना मदत करू शकता. हेल्प शीटमध्ये दिलेल्या सेवांचा उल्लेख करून त्यापैकी एखाद्या सेवेशी संपर््क करण्यासाठी तुम्ही त््याांना प्रोत्साहन देऊ शकता. (त््याांना मान्य असेल तर) त््याांच्या वतीने तुम्ही अपॉईंटमेेंट घेऊ शकता किंवा पहिल्या व्हिजीटसाठी त््याांच्या सोबत देखील जाऊ शकता.
आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुसाइडमुळे शोक करणाऱ््ययाांना स्वतःच्या मनात काही वेळा सुसाइडचे विचार येऊ शकतात. त््याांच्यात सुसाइडच्या धोक्याचे संकेत दिसत आहेत का ह्यावर लक्ष ठेवणे आणि त््याांना तज््ञाांची मदत घेण्यासाठी तयार करणे हे महत्त्वाचे आहे.
पियर सपोर््ट ग्रुप हा एक सुरक्षित पर््ययाय आहे जिथे आपले विचार आणि भावना मोकळेपणाने शेयर करता येऊ शकतात. आणि आयुष्याला चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी तिथे टिप्स मिळू शकतात. सुसाइडमुळे जवळच्या व्यक्तीला गमावण्याचा अनुभव समजून घेणाऱ््ययाांच्या संपर््ककात येणे त्या व्यक्तीसाठी उपयुक्त ठरू शकते.
गत व्यक्तीबद्दल बोलणे कदाचित तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा त्यामुळे दुःखद भावना उफाळून येतील अशी भीती वाटत असेल. परंतु अनेक शोकाकुल व्यक््तीींना गत व्यक्तीच्या आठवणी काढणे आणि त््याांचे किस्से शेयर केल्याने दिलासा मिळू शकतो. काही काळ लोटल्यानंतर, तुम्ही गत व्यक्तीच्या सकारात्मक आठवणी शेयर करू शकता.
मृताच्या कुटुंबीयांनी मृत्यूबद्दल कोणत्या गोष्टी लोकांना सांगायचे हे ठरवले असेल तर त्याचा आदर करा. सुसाइडविषयी बोलताना, संवेदनशील आणि कोणाला कलंक न लावणारी भाषा वापरा. ‘सुसाइड केली’ असे न म्हणता ‘सुसाइडमुळे मृत्यू झाला’ किंवा ‘स्वतःचा जीव घेतला’ असे म्हणा. मृत व्यक्तीबद्दल मत व्यक्त करण्याचे टाळा.
शोकाकुल असलेल्या एखाद्या व्यक्तीला आधार देणे आणि त््याांची काळजी घेणे भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या तणावाचे असू शकते. दुसऱ््ययाला आधार देण्याआधी तुम्ही स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित आहार घेणे, चांगली झोप होऊ देणे आणि विरंगुळ्यासाठी काही गोष्टी करणे महत्त्वाचे आहे.
Feedback helps us improve our content and resources to make the experience better for everyone.