© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
एखाद्या जवळच्या व्यक्तीला, मित्राला अथवा नातलगाला खडतर समयी मदत करायचे मार्ग
सुसाइड करण्याचे विचार आणि भावना अनुभवणाऱ््यया आपल्या जवळच्या व्यक्तीची चिंता लागून राहणे हे अतिशय क्लेशदायक होऊ शकते. आपले आयुष्य संपवण्याविषयी ते बोलले असतील किंवा तुम्हाला त््याांच्या घोर निराशेचे संकेत दिसले असतील. अशा कठीण परिस्थितीमधील व्यक्तीला आधार देण्यासाठी तुम्ही करु शकता अशा या काही गोष्टी.
जर मेडिकल इमरजन्सी असेल तर/ एखाद्या व्यक्तीने सुसाइडचा प्रयत्न केला आहे:
धोक्याचे संकेत ओळखणे शिकून घ्या, जेणेकरून आपली प्रिय व्यक्ती सुसाइड करण्याच्या विचारांशी झगडत असल्याचे संकेत तुम्ही ओळखू शकाल. जर तुम्हाला तसे संकेत दिसले, तर ते सुसाइडचा विचार करत आहेत काय असे त््याांना स्पष्टपणे विचारा. त््याांच्याशी संवाद सुरु व्हावा याकरिता उघड आणि थेट प्रश्न विचारण्यावर लक्ष केें द्रित करा. तुम्ही हे म्हणू शकता:
“माझ्या लक्षात आलं आहे की अलिकडे तुमची मनस्थिती खालावली आहे. तुम्ही कसे आहात हे मला जाणून घ्यायचे आहे. सुसाइड करण्याबाबतचे विचार तुमच्या मनात येत आहेत का ? मला तुमची काळजी वाटते. मला कल्पना आहे की ह्याविषयी बोलणे कठिण असू शकते, पण तुम्हाला जर बोलावसं वाटेल तर ऐकायला मी आहे.”
काहीींना भिती वाटते की सुसाइडविषयी बोलल्याने ती कल्पना त्या व्यक्तीच्या मनात शि रते कि ं वा ते विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त््याांना प्रोत्साहन मि ळते, पण हे खरं नाही. खरं तर, सुसाइडविषयी मोकळेपणाने बोलण्याने त्या व्यक्तीच्या मनावरचा ताण हलका होतो आणि त््याांना स्वतःच्या विचारांबद्दल उघडपणे बोलण्याकरिता प्रोत्साहन मिळते.
ते सुसाइडचा विचार करत आहेत हे जर त््याांनी कबूल केले तर ते एकटे नसून तुम्ही त््याांच्याबरोबर आहात आणि दोघे मिळून ह्या संकटातून तुम्ही मार््ग काढू शकता असा दिलासा त््याांना द्या.
सुसाइडविषयीच्या सर््वच विचारांकडे गांभीर््ययाने पाहणे महत्त्वाचे आहे, पण ज््याांनी सुसाइड कशी करावी याची योजना तयार केली आहे अशा व्यक्ती ह्या अधिक धोक्यात असतात. म्हणून त््याांच्या तत्काळ सुरक्षिततेसाठी काही गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला तुम्ही हे प्रश्न विचारायला हवेत:
“स्वतःला तुम्ही जीवे कसे माराल ह्याबद्दल तुम्ही विचार के ला आहे का?”
“स्वतःला तुम्ही जीवे कधी माराल ह्याबद्दल तुम्ही काही विचार के ला आहे का?”
“तुमचा हा प्लान पार पाडण्यासाठी लागणाऱ््यया वस्तू मिळवण्याचा तुम्ही काही प्रयत्न के ला आहे का?”
त््याांनी पूर्वी कधी स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न के ला आहे का याचाही तपास करा.
त्या व्यक्तीला असलेल्या धोक्याच्या तीव्रतेची कल्पना, तम्ु हाला वरील प्रश््नाांच्या उत्तरावं रून येईल. ह्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल तर ते सुसाइडचा प्रयत्न करण्याचा धोका मोठा आहे हे लक्षात येते. अशा वेळी, तुम्ही पुढील उपाययोजना करू शकता:
1. ते सुसाइड करण्याचा धोका टळेपर्यंत किं वा ते सुरक्षित होईपर्यंत ते एकटे असणार नाहीत ह्याची काळजी घ्या.
2. ज्या वस्तू सुसाइड करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात (उदाहरणार््थ गोळ्या (पिल्स), विष, रेझर, चाकू किं वा ब्डले यासं ारख्या धारदार वस् तू ) त्या त््याांच्यापासून दूर करा.
3. त्या व्यक्तीचे मन ससु ाइडच्या विचारापं ासनू इतरत्र कसे वळवता येईल ह्याचा विचार करा. त््याांचे एखादे आवडीचे काम, ज्याचा उपयोग ह्यापूर्वी एखाद्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास झाला आहे, अशा कामाची निवड त््याांना करायला लावणे अधिक चागं ले.
4. आपल्या विश्वासातील कु टंुबीय किं वा मित्राची अधिक आधारासाठी मदत घ्या. संकटातील व्यक्तीला ह े सागं ा की त््याांच्या सरुक्षिततसे ाठी त््याांच्या जवळच्या काहीजणाचं ी मदत तम्ु ही घणे ार आहात.
5. एखाद्या प्रशिक्षित तज्ञाची (डॉक्टर, समुपदेशक, थेरपिस्ट) मदत घेण्यासाठी किं वा क्रायसिस (संकटसमय) हेल्पलाईनला फोन करण्यासाठी त््याांना प्रोत्साहन द्या.
जर ती व्यक्ती संभाषण चालू ठेवू शकली तर पुढे बोलत राहण्यासाठी तुम्ही त््याांना प्रोत्साहित करू शकता. त््याांना भावनिक आधार द्या आणि ते त््याांच्या द:ु खाबद्दल सागं त असताना, पर््णू सहानभु तू ीन े त््याांचं बोलणं ऐकू न घ्या.
तुम्हाला ज्या व्यक्तीची काळजी आहे, ती जीव देण्याचा विचार करत आहे हे ऐकल्यावर नाराज होणे किंवा राग येणे स्वाभाविक आहे. त्यावर ताबडतोब उपाय त््याांना सुचवण्याची तीव्र इच्छा तुम्हाला होऊ शकते वा स्वतःसाठी योग्य निर््णय ते घेत नाही आहेत असे तुम्हाला वाटू शकते. पण त््याांच्या अनुभवाविषयी कोणतेही मत तयार करून टीका न करता शांत रहाणे खूप महत्त्वाचे आहे. मन मोकळे करण्यासाठी त््याांना हवा तितका वेळ घेऊ द्या. त््याांच्या भावनांचा अनादर झाला तर त््याांच्याबरोबर चाललेला संवाद पूर््णपणे थांबू शकतो.
त््याांना कशा प्रकारे मदत करता येईल याचे मार््ग, तुम्ही त््याांच्याबरोबर एकत्र येऊन शोधू शकता काही मार््ग असे आहेत, उदाहरणार््थ:
a. व्याव सायिक मदत मि ळू शकेल अशा लोकांशी संपर््क हेल्प शीटमधील यादीत असलेल्या मानसिक आरोग्य व्यावसायिक सेवांची माहिती देऊन त्यापैकी एखाद्या सेवेची मदत घेण्यासाठी त््याांना प्रोत्साहित करा. तुम्ही त््याांना अपॉईंटमेेंट घेऊन देऊ शकता किंवा त््याांना उपकारक होत असेल तर पहिल्या व्हिजीटसाठी त््याांच्या सोबत जा. व्यावसायिक सल्ला घेण्यासाठी जर ते तयार झाले नाहीत तर त््याांना दिलासा द्या की तुम्ही त््याांच्या सोबत आहात आणि त््याांच्या मनाची तयारी झाली की ते व्यावसायिक सल्ला घेऊ शकतात. एखाद्या डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तज्ञाचा सल्ला घेण्यासाठी ते तयार नाही झाले तर पियर आधार गटाची किंवा संकटकालीन (क्रायसिस) हेल्पलाईनची मदत घेण्याचे त््याांना सुचवा.
b. सपोर््ट नेटवर् ्क च्या दि शेने हात पुढे करा तुम्ही देऊ शकत असलेल्या आधाराची मर््ययादा ओळखणे महत्वाचे आहे. तुम्ही किंवा तुम्ही मदत करत असलेल्या व्यक्तीने हे एकट्याने करण्याची गरज नाही. तुम्ही दोघे मिळून, तुम्हाला मदत करु शकतील असे तमु च्या विश्वासातील कु टंुबीय/मित्र/ समुदाय (कम्युनि टी) गट शोधू शकता - जे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमची मदत करू शकतील.
c. सेफ्टी प्लान (सुरक्षा योजना) तयार करा “सेफ्टी प्लान” हे एक असे साधन आहे जे सुसाइड करण्याचे विचार आणि भावना अनुभवत असलेल्या व्यक्तीला आधार देऊन मार््गदर््शन करते. ह्या विषयावर झालेल्या संशोधनातून असे कळले आहे की सुसाइड सेफ्टी प्लानिंगच्या सहाय्याने सुसाइड रोखल्या जाऊ शकतात. ह्या योजनेच्या वेगवेगळ्या भागांत, धोक्याचे संकेत ओळखणे, सामना करण्यासाठीची धोरणे, जवळच्या व्यक््तीींची आणि आधार सेवांची संपर््क माहिती आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय योजना इत्यादी, माहिती दिलेली असते. अशी सुरक्षा योजना त्या व्यक्तीबरोबर तयार करण्यात तुम्ही आपणहून मदत करु शकता.
इतरांची काळजी घेताना कधी कधी स्वतःच्या गरजांकडे आपले सहज दुर््लक्ष होऊ शकते. शोक/ वियोगाच्या दुःखात असलेल्या व्यक्तीची काळजी घेणे भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या तणावाचे असू शकते. त्यामुळे, दुसऱ््ययाला चांगल्या प्रकारे आधार देण्यासाठी त्याआधी तुम्ही स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. स्वतःचा नियमित आहार, शांत झोप आणि आवडत्या गोष््टीींसाठी थोडी सवड, या बाबींकडे लक्ष द्या. त्या व्यक्तीचे आयुष्य व निर््णय यांसाठी तुम्ही जबाबदार नाही हे लक्षात असू द्या.
Feedback helps us improve our content and resources to make the experience better for everyone.